मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर खरेदीत गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून घोरपडीतील नागरिकाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संवाद साधला. “गोल्ड अँड ऑइल”मध्ये शेअर खरेदीसाठी पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळेल असे भासवून फिर्यादी यांना लिंक दिली.
त्यात मेल आयडी तसेच प्रोमो कोड भरून फिर्यादी यांना शेअर ट्रेडिंगसाठी एक वेबसाइटवर खाते तयार करून वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास प्रवृत्त केले. एकूण ७,३५,००० रुपये घेऊन फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम करीत आहेत.

















