लोणीकंद पोलीस स्टेशने दिला होता प्रस्ताव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या ‘एन्जॉय ग्रुप’वर लोणीकंद पोलीसांकडून मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
स्वारगेट येथे २०१३ साली झालेल्या कुणाल शंकर पोळ यांच्या खुनाचा वचपा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘एन्जॉय ग्रुप’च्या एकूण आठ आरोपीं विरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशनकडून मोक्का कायद्याच्या प्रस्तावास अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) पुणे शहर यांनी मंजुरी दिली आहे.
दि. २९ ऑगस्ट रोजी रात्री ११:३० च्या सुमारास हॉटेल स्वराज गार्डन, कोलवडी, पुणे येथे पवार वस्तीसमोर फिर्यादी हे कारने जात असताना जुन्या वादातून घातपात घडवण्याच्या हेतूने आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
या प्रकरणी १) अमित म्हस्कु अवचरे ऊर्फ औचरे (वय २७, रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे), २) सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६, रा. गंजपेठ, पुणे), ३) लतिकेश गौतम पोळ (वय २२, रा. कात्रज कोंढवा रोड, पुणे), ४) शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), ५) ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४, रा. भारती विद्यापीठ, पुणे), ६) अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे), ७) राज बसय्या ऊर्फ बसवराज स्वामी (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे) यांना अटक करण्यात आली होती.
हे आरोपी संघटितपणे वारंवार गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची शिफारस लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडू, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी प्रस्ताव तयार केला होता.
हा प्रस्ताव पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, पुणे हिंमत जाधव यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे, मनोज पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता.















