लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बँकेच्या लॉकरमधील दागिने व रोकड चोरी झाल्याचा प्रकार लष्कर भागात उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपानबाग येथील फिर्यादीने काही महिन्यांपूर्वी आरोरा टॉवर्स, कॅम्प, पुणे येथील बँकेच्या लॉकरमध्ये दागिने व रोकड ठेवली होती. दोन महिन्यांपूर्वी त्याने बँकेमधील लॉकरमध्ये दागिने व रोकड सुस्थितीत असल्याचे पहिले होते.
मात्र, १३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान, तीन इसमांनी त्याचा लॉकर उघडून दागिने व रोकड चोरली आहे. सर्व रोख रक्कम रु. ९,५०,०००/- तसेच सोन्या-चांदीचे, डायमंडचे मौल्यवान दागिने आणि पावत्या लंपास केल्या आहेत. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे करीत आहेत.
