रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ बार्शी तर्फे सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ बार्शी यांच्या वतीने अंगणवाडी व बालवाडी शिक्षकांचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ बार्शी येथे रविवारी (दि. 29 सप्टेंबर) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. प्रणाली शेटे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून रो. अनिल काका बंडेवार, रो. मधुकर डोईफोडे यांची उपस्थिती होती. तसेच, रोटरी क्लब ऑफ बार्शीचे अध्यक्ष रो. अतुल कल्याणी, रो. शैलेश वखारिया, रो. संजय हिंगमिरे, रोटरॅक्ट अध्यक्ष रो. गणेश स्वामी, व सचिव रो. नवनाथ गुल्हाने आदी मान्यवर देखील उपस्थित होते.
यावेळी उल्का पालखे, सुनंदा लुंडे, आनंदी गुंड, दीपाली गोरे, अनुराधा करवा, वंदना कुलकर्णी, दीपमाला जाधव, दीपाली सहस्त्रबुद्धे, हेमलता मुंढे, गायत्री महाजन, महानंदा शिंघनाथ, महानंदा शेळके, संगीता कदम, सविता उमाप, शैला राऊत, सुनंदा शिंदे, उमा जाधव, संगीता वाघुले यांचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रमाणपत्र, ट्रॉफी, गुच्छ, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अंगणवाडी म्हणजे शिक्षणाची पहिली पायरी, मुलांच्या विकासाची पहिली दिशा. या पायरीवर पाऊल ठेवताना हे शिक्षक आपल्या प्रामाणिक व समर्पित सेवेद्वारे मुलांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहेत.
त्यांच्यावर अंगणवाडीतील मुलांची उपस्थिती नोंदवणे, मातांची देखभाल, पोषण आहाराची माहिती नोंदवणे, विविध सरकारी योजनांचे फायदे लाभार्थ्यांना पोहोचवणे, आणि या सर्वांचे अहवाल सरकारला पाठवणे अशी प्रशासकीय जबाबदारी असते. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती बार्शी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष रो. गणेश स्वामी यांनी दिली.

