महाराष्ट्र न्युज नेटवर्क
आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात डॉ. सुनील जगताप यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचा कानमंत्र दिला. विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयातील क्रीडा व आरोग्य समिती अंतर्गत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. सुनील जगताप यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. सुनील जगताप यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य चांगले रहावे, बौद्धिक विकास व्हावा, विद्यार्थ्यांनी कोणत्याही विकाराला किंवा संकटांना बळी न पडता प्रसन्नतेने वावरावे व मानसिक आरोग्य उत्तम रहावे यासाठी व्यायाम, ताणतणावापासून मुक्तता, पोटाचे आरोग्य, मोबाईल व टीव्हीचे दुष्परिणाम, योगाचे महत्त्व इत्यादींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, क्रीडा विभाग प्रमुख श्रीरंग पवार, क्रीडा शिक्षक वाय. एस. कांबळे, प्रकाश पवार, राजश्री भुजबळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लिखे यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

