भारती विद्यापीठ पोलिस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भारती विद्यापीठ पोलिस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने आंबेगाव परिसरात धडक कारवाई करून रस्त्यावर विक्रीसाठी आणलेली ५६,९०,०००/- रुपये किंमतीची अफू जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पोलिस पथक पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनच्या परिसरात गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार, आंबेगाव, पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी देवीलाल शंकरलाल आहीर (वय ४२ वर्षे, रा. कात्रज, पुणे) यांच्या ताब्यातून एकूण ५६,९०,०००/- रुपये किंमतीचे २ किलो ८४५ ग्रॅम अफू हा अंमली पदार्थ, तसेच माल लपवण्यासाठी वापरलेली अॅक्टीव्हा गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, संदीप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे आणि दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

