समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : अमली पदार्थ विरोधी पथक २ ची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या पथक २ ने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नानापेठेत कारवाई करीत कोंढव्यातील दोघाकडून कर्नाटकातून बेकायदा विक्रीसाठी आणलेला 10 लाख 84 हजार 716 रू कि.चा. प्रतिबंधित पान मसाला जप्त केला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० सप्टेंबर रोजी पोलिसांनी साडेपाच च्या सुमारास केलेल्या कारवाईत पोलीसाच्या पथकाने मुदस्सर इलियास बागवान (वय 40 वर्ष, रा. भाग्योदय नगर कोंढवा) व अन्वर शरबुद्दीन शेख (वय 38 वर्ष रा. भाग्योदय नगर कोंढवा) यांनाअटक केली आहे.
त्यांच्या कडून 10, 84, 716/- रु. किमतीचा प्रतिबंधित पान मसाला व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित मालाची ने आण करणाऱ्या टेम्पो (क्र. MH12, TU 3643) जप्त करण्यात आलेला आहे आहे.
सदर कारवाई अमली पदार्थ विरोधी पोलीस पथक २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, युवराज कांबळे यांनी केली आहे.

