शासनाचे सर्व समाजाकडे लक्ष : सर्वाधीक कर देणाऱ्याकडे मात्र दुर्लक्ष
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : देशाच्या विकासासाठी सर्वाधीक जास्त कर भरणारा समाज म्हणून जैन समाजाकडे पाहिले जाते. देशासह राज्याच्या जडणघडणीत जैन समाजाचा नेहमी मोठा वाटा राहिला आहे. मात्र निडणुका तोंडावर येऊन देखील या शासनाला जैन समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याची गरज वाटत नाही.
अहिंसाप्रीय जैन समाज कायम देण्यात विश्वास ठेवतो. आपल्या देशावर, राज्यावर कोणतेही संकट आले की सर्वात आधी धावणाऱ्या या समाजाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने दूर्लक्ष केल्यांने जैन समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५० कोटीचे भाग भांडवल दिले जाईल. आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या महामंडळाला ५० कोटी भागभांडवल देण्यात येणार आहे.हे निर्णय शासनाने घेतले याचे सर्व जैन समाज स्वागत करीत आहे. जैन समाजात देखील अनेक गरीब बांधव आहेत. त्यांच्या उद्धाराची जबाबदारी देखील शासनाने घेणे आवश्यक आहे.
जो समाज सर्वात जास्त कर देतो त्या समाजातील उपेक्षित लोकांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. मात्र मतदार संख्या कमी असल्यामुळे राज्यकर्ते कायमच जैन समाजाच्या मागण्यांना दूर्लक्षीत करीत आले आहेत. महाराष्ट्रातील जैन समाज लाखो लोकांना रोजगार देणार समाज आहे.हा समाज जागृत झाला तर निडणूकीचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही.

