दांडियाच्या तालावर थिरकणार तरूणाई : मिडिया पार्टनर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : दांडिया प्रेमींसाठी यश कोठारी यांच्या वतीने पंखीडा रास गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रीच्या काळात ११ ऑक्टोबर रोजी बिबवेवाडीच्या यश लॉन्समध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात खास मुंबईचा यशोधन बँड सहभागी होणार आहे.
देवीची महती सांगणारी गाणी नटून सजून आलेली तरूणाई जल्लोष, उत्साह आणि मोकळ्या मैदानात गाण्याच्या तालावर थिरकणारे पाय हे चित्र येत्या नऊ दिवसात पुण्यात विविध ठिकाणी पहायला मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. यश लॉन्सच्या विस्तीर्ण मैदानावर तरूणाईला संध्याकाळी ६.३० ते रात्री १२ पर्यंत या दांडियामध्ये सहभागी होता येणार आहे.
नऊ दिवस अखंड देवीचा जागर होत असताना तरूणाईसाठी आयोजक हे देवी भक्तांसाठी दांडिया स्पर्धेची एक अनोखी पर्वणी घेऊन आले आहे. या स्पर्धेमध्ये उत्तम पुरुष डान्सर, उत्तम स्त्री डान्सर, उत्कृष्ट जोडी तसेच संघाच्या पातळीवर उत्कृष्ट समूह नृत्य आणि लहान मुलांचा उत्तम ग्रुप अशी बक्षीसे यामध्ये देण्यात येणार आहेत.
नवरात्रीच्या कालावधीत संपूर्ण पुण्यात होणारा हा सर्वात मोठा दांडिया उत्सव असल्याचे आयोजक यश कोठारी यांनी सांगितले. लवकीष जैन, कार्तिक पटेल, भाविक शहा,निर्मय छाजेड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या दांडियाला विविध उद्योगसमूहांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
मारवार ज्वेलर्स, विन-विन प्रोपटेक, साकरीया ज्वेलर्स, धागासुत्र, कावेडिया ज्वेलर्स, जयराज स्पोर्ट्स अॅड कन्वेन्शन सेंटर, चोरडिया इन्फ्रास्ट्रक्चर, महाराष्ट्र न्युज नेटवर्कचे संपादक अभिजीत डुंगरवाल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.


 
			

















