महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
प्रत्येक बोलणाऱ्या माणसाला आवाजाची ईश्वरदत्त देणगी मिळालेली असते. त्याचा सर्वजण चांगल्या प्रकारे उपयोग करत नाहीत, ही खंत आहेच. परंतु काही व्यवसायांसाठी चांगला, नितळ, स्वच्छ आवाज असणे हे भाग्यच आहे. मला वाटते की रेडिओतून आलेला असा आवाज तुम्हाला आकर्षित करत असतो. त्याशिवाय टीव्हीवरील निवेदक, नाटकातील नटांचा आवाज या सर्वच क्षेत्रांत तुमच्या आवाजाचा कस लागतो. पूर्वी प्रदेशात आवाज विकसित करण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी जावे लागे, पण आता भारतातही ते उपलब्ध होऊ लागले आहे. आणि हो, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे तर घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही हे करू शकता. पुण्यातील योगेश जैन यांनी असे वर्ग सुरू केले आहेत. अर्थात, त्यांच्या सप्तसूर अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही पुण्यात येऊन या वर्गांचा लाभ घेऊ शकता.
२०११ साली स्थापन केलेल्या सप्तसूर अकॅडमीचे संचालक योगेश जैन हे पद्मश्री पंडित सुरेश वाडकर यांच्याकडे संगीत शिकले. सप्तसूर संस्थेद्वारे अनेकांना गायन, तबला, पखवाज, पेटी, गिटार, कीबोर्ड यांचे शिक्षण तर मिळालेच आहे, पण त्यांच्या विद्यार्थ्यांच्या तसेच इच्छुकांच्या विनंतीमुळे त्यांनी २०२० साली रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू केला. या स्टुडिओमध्ये डबिंग, व्हॉईस-ओव्हर इत्यादीसाठी सोय आहे. याला जोडूनच त्यांनी आवाजावर काम करायला सुरुवात केली. त्यातून ऑनलाईन व ऑफलाईन आवाज विकसित करण्याचे वर्ग आकाराला आले.
सध्या एआयचा जमाना असला तरी नैसर्गिक रित्या तुम्हाला जो आवाज मिळतो, त्याचे सोने करणे हे तुमच्या हाती असते. चांगला नितळ आवाज असला तरी तो विकसित करणे तुमच्याच फायद्याचे ठरू शकते. किशोर कुलकर्णी आणि श्री नागेश अडगांवकर यांनी सुरुवातीचे संगीत शिक्षण दिले. पंडित सुरेश वाडकर यांच्याकडे संगीत शिक्षण घेण्याचीही योगेशजींना संधी मिळाली. पंडित गणपतराव पर्वतकर यांच्याकडे तबला तसेच पंडित गोविंद भिलारे यांच्याकडे पखवाज शिकण्याची संधी त्यांना मिळाली. ज्योत्स्ना गणपुले यांच्यासोबत गीतरामायणाचे कार्यक्रमही ते सादर करतात.
करिअर करताना आवाजावर काम करणे हे फार थोड्या लोकांना माहिती असते. जसे तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असू शकते, तसाच तुमचा आवाजही अनेकांना खिळवून ठेवू शकतो. अनेक भाषांचा, लकबींचा अभ्यास, निरीक्षण क्षमता, उत्स्फूर्तता तुमच्याकडे असेल तर मग काय? हे क्षेत्र तुमचंच आहे. अर्थात, त्यासाठी परिश्रमाचीही जोड हवीच. चांगले निवेदन असो की सूत्रसंचालन, ऐकणाऱ्यांना आकर्षित करण्याचे कौशल्य हवे. यासाठी नवनवीन गोष्टी शिकणे आणि अभ्यास करणे आवश्यक आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा निसर्गदत्त आवाज आणखी श्रवणीय करू शकता. योगेशजींनी तर ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग सुरू केलेले आहेत, त्याचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा. अलीकडच्या काळात भरपूर वाहिन्या सुरू झाल्या आहेत, तसेच मनोरंजनाला नेहमीच मागणी असते. त्यामुळे तुम्ही व्हॉईस ऍक्टिंग करू शकता, सूत्रसंचालन करू शकता किंवा आवाजाच्या जोरावर कार्यक्रम सादर करू शकता. संगीत रजनी असो वा सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार प्रकाशन समारंभ—सर्वच कार्यक्रमांत सूत्रसंचालन हवेच. त्यात तुमचा अभ्यास असेल तर मग विचारायलाच नको! कुठल्या शब्दावर जोर द्यायचा, चढ-उतार कुठे करायचा याचे प्रशिक्षणही आवश्यक आहे.
कार्टून असो वा एखादे पात्र, त्यांचा मूळ आवाज जपण्याचे कौशल्य आवश्यक असते. यासाठी नियमित अभ्यास आणि प्रशिक्षण घेऊन सुधारणा करता येते. मूळ पात्राचा आवाज, पोत, शैली ध्यानात घेऊनच काम करावे लागते. खासगी रेडिओ वाहिन्यांमध्ये तर निवेदन व विविध भाषांवर प्रभुत्व असलेल्या लोकांना संधी मिळते. रेडिओ जॉकी हे क्षेत्र तुम्ही ऐकले असेलच. आवाज आणि भाषेवर प्रभुत्व हे त्याचे विशेष गुण आहेत. प्रसंगावधानता, चांगला शब्दसंग्रह, सृजनशीलता, उत्स्फूर्तता आणि आत्मविश्वास या गुणांचा विकास करणे आवश्यक असते. कार्यशाळांमध्ये सर हे सर्व तुम्हाला शिकवतीलच. त्यांच्या संपर्क क्रमांकावर (९५११९५११५१) तुम्ही संपर्क साधून तुमची वेळ ठरवू शकता. ऑनलाईन वर्गाचा फायदा म्हणजे तुम्ही घरबसल्या तुमच्या फावल्या वेळेत हे वर्ग करू शकता.

