अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी अडीच लाखांचे एल.एस.डी. व एम.डी.एम.ए. हे अंमली पदार्थ जप्त करून एकास जेरबंद केले आहे. त्याच्या कडून एकूण ४,१८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी पुणे शहरातील अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने, दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अधिकारी व अंमलदार कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरात गस्त घालत होते.
पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेल्या माहितीनुसार, वनाज मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी तेजस सुरेश गोपाल (वय २२ वर्षे, रा. श्रीराम सोसा. फ्लॅट नं. २, लेन नं. ५, डहाणुकर कॉलनी, कोथरूड, पुणे; मूळ पत्ता: रा. कोकोडी, मकरा जि. कालीकट, राज्य केरळ) हा संशयित आरोपी मिळाला. त्यास ताब्यात घेतल्यावर त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून अडीच लाखांचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले.
त्याच्याकडे : ४८,०००/- रुपयांचा एल.एस.डी. व एम.डी.एम.ए. अंमली पदार्थ
२,००,०००/- रुपयांच्या एम.डी.एम.ए. ५० गोळ्या
२०,०००/- रुपयांचा मोबाईल
१,५०,०००/- रुपयांची एक मोटारसायकल
असा एकूण ४,१८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक करत आहेत.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, नितीन जगदाळे, निलम पाटील, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.


















