महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भारती विद्यापीठ परिसरातून पायी जात असताना एका तरुणीचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही १९ वर्षांची तरुणी कात्रजमध्ये राहणारी असून, ती मोबाईलवर बोलत पायी चालत होती. उत्कर्ष सोसायटी जवळील गणेश मंदिरासमोर भर दुपारी दीड वाजता ही घटना घडली.
तिने आरडाओरडा केला, पण चोरटा पळून गेला. तिच्या मदतीला कोणीही आले नाही. तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.परिसरात पोलिस गस्त वाढवण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. या भागात मोठ्या संख्येने विद्यार्थी असतात, आणि त्यांना सुरक्षित वाटणे आवश्यक आहे, असे मुलीनी सांगितले.
