सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका तरुणीची २० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीत राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना ३ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान घडली. एका मोबाइल धारकाने त्यांच्याशी संपर्क साधून, शेअर ट्रेडिंग कंपनीचे अधिकृत व्यक्ती असल्याचे भासवले आणि त्यांच्या शेअर ट्रेडिंग खात्याद्वारे ट्रेडिंग केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले.
तसेच, ट्रेडिंगसाठी एक लिंक पाठवली. सुरुवातीला काही प्रमाणात रक्कम त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या बँक खात्यांमध्ये क्रेडिट करून विश्वास संपादन केला. त्यानंतर, विविध बँक खात्यांवर एकूण २०,९६,०००/- रुपये ट्रान्सफर करून घेतले.
रक्कम परत न करता, त्यांच्या ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे करत आहेत.
