चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : स्टॉक मार्केट ट्रेडिंग व आयपीओ अलॉटमेंटमध्ये भरघोस नफा मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवून वडगाव शेरीतील एका तरुणाची ८ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ फेब्रुवारी ते दि. १५ मार्च २०२४ दरम्यान ऑनलाईन माध्यमांद्वारे फिर्यादी, २८ वर्षीय तरुणाशी, एका मोबाईल धारक तरुणाने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला.
स्टॉक मार्केट ट्रेडिंग व आयपीओ अलॉटमेंटमध्ये भरघोस नफा मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि विविध बँक खात्यांवर एकूण ८,४०,३६०/- रुपये ट्रान्सफर करून घेतले. मात्र, पैसे परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने करीत आहेत.
