दुष्काळीजिल्हा डाग पुसण्याची शपथ 11 कोटींचे वीज बील देणार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : धाराशिव जिल्ह्याला लागलेला दुष्काळाचां डाग येत्या पाच वर्षात आपण पुसून काढणार आहोत,असा निर्धार महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार, पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे 11 कोटींचे वीज बील देणार असून 2 हजार कोटींचा निधी आणला असे सावंत यांनी सांगितले.
जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सावंत यांनी मंगळवारी विधान सभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर महायुतीची विजय संकल्प सभा पार पडली.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व नेत्यांनी सावंत यांच्या विजयाचा संकल्प केला.यावेळी मंत्री सावंत यांनी विकास कामांचा लेखाजोखा मांडत हरीत, धवल व उद्योग क्रांती करण्याचा नारा दिला.
येत्या 5 वर्षात धाराशिव जिल्ह्याला लागलेला दुष्काळी डाग पुसण्याची शपथ सावंत यांनी घेतली. शेतकऱ्यांचे 11 कोटींचे वीज बील देणार असल्याचे सांगत त्यांनी 2 हजार कोटींचा निधी आणला असे सांगितले. 2029 पर्यंत मी काय करणार हे महत्वाचे आहे. पाणी आल्यावर सगळे प्रश्न संपले असे नाही, पाणी सगळीकडे साठवण तलाव व वितरण व्यवस्था झाली पाहिजेत.
शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, हक्काची डीसीसी बँक मोडून खाल्ली, दुध संघ संपवला, सुतमिल शेअर गोळा केले मात्र ती सुरु झाली नाही त्या सर्व संस्था पुन्हा नावारुपास आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याची शेत धरण, तलावापासुन दुर आहेत त्यांना उपसा जलसिंचन संस्था नोंदणी करायला सुरु करा असे मंत्री सावंत म्हणाले.
त्या पाणीपुरवठाचे सर्व 5 वर्षाचे प्रतीवर्षे 11 कोटी प्रमाणे 55 कोटींचे बील भैरवनाथ शुगर भरेल असे आश्वासन दिले. 26 नोव्हेंबर सरकार स्थापन होईल त्यात आपण मंत्री म्हणुन शपथ घेऊ असे सावंत म्हणाले. भुम परंडा वाशी येथे दीड दीड हजार एकरची एमआयडीसी मंजुर केली आहे, पुणे मुंबई येथील उद्योजक यांना इथे उद्योग सुरु करुन रोजगार देऊ व स्थानिक तरुणांना उद्योजक बनवू, 4-5 हजार कोटींची गुंतवणूक आणल्याशिवाय शांत बसणार नाही.
धवल, हरित, उद्योग क्रांती करायची आहे. गावोगावी विकास करायचा असुन 500 कोटी पेक्षा अधिक निधी आरोग्यासाठी दिला आहे असे सावंत म्हणाले. धाराशिव जिल्ह्यात 4 कारखाने असुन 1 तयार होतआहे, रोजगार दिला. बचत गटाच्या माध्यमातूनरोजगार दिला त्यामुळे त्यांना 7-8 हजार महिन्यालामिळत आहेत. 2024 पर्यंत 42 निर्णयघेतले.
महिला, वारकरी, तरुण यांच्यासाठी कामकेले असल्याचे मंत्री सावंत म्हणाले. शेतकऱ्यांचापाण्याचा प्रश्न कायमचा सोडवू असे वचन दिले होते,ते पुर्ण करणार आहे. आजच्या रॅलीने विजयाचा गुलाल उधळला आहे.महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून जितका निधी आला त्यापेक्षा जास्त निधी आणला.
परंडासाठी 175 कोटी निधी आला, हे शहरात तर 13 गट व 26 गणात ग्रामीण भागात प्रत्येक गटात 40 कोटी निधी दिला, दीड हजार कोटींचा निधी आणलाअसे सावंत म्हणाले. सभेला गिरीराज सावंत, धनंजय सावंत, केशव सावंत, दत्ता साळुंके, गौतम लटके, संजयनाना गाढवे, सुभाष सिद्धीवाल, बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, अण्णासाहेब देशमुख, जाकीर सौदागर, राहुल डोके, बालाजी गुंजाळ यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थितीत होते.
1 लाख मताच्या फरकाने विजयी होणार असल्याने निकाला दिवशी गुलाल घेऊन या असे सावंत म्हणाले. लहुजी शक्ती सेनेने सावंत यांना पाठिंबा दिला. मराठा व धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या वारसांना आर्थिक मदत केली आहे असे रिपाईचे संजय बनसोडे यांनी सांगितले.
सोनारी येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधी पालकमंत्री डॉ सावंत यांनी दिला. मोटे यांनी बाणगंगा साखर कारखाना चालवला नाही, उसला कमी भाव देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला. पाणी आणले नाही ते काम सावंत यांनी केले. पाडाव्यापर्यंत पाणी येणार आहे.
माजी आमदार मोटे यांनी विकास केला नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नवनाथ जगताप यांनी केली.महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना दराडे यांनीसांगितले की, महायुतीने महिलांना सन्मान दिला, जेशासन स्त्रीचा सन्मान करते ते टिकते, जे शासनअपमान करते ते टिकत नाही हा रामायण महाभारतइतिहास आहे.
लाडकी बहीण, शेतकरी पेन्शन असेसरकार एका कुटुंबाला दरवर्षी 51 हजार देते.सावंतयांच्या पाठीशी महिला उभ्या राहतील असे त्यांनीसांगितले. महिला मोठ्या संख्येने आल्या असुन असेचित्र पहिल्यादा दिसत आहे. लाडकी बहीण योजनामहिलांना आधार देणारी ठरत असल्याचे भाजपचेबाळासाहेब क्षीरसागर म्हणाले.
सुरुवातीला यायोजनेवर टीका केली, योजना बंद पडेल, सरकारदिवाळखोरीत निघेल अशी टीका केली मात्र तीयशस्वी करुन दाखवली. सावंत यांचा विजय हा राज्यातील विक्रमी निकाल असेल .कोणत्याही राजकीय नेत्याने धर्मावर बोलु नये, विकासावर बोलावे, मोटे 15 वर्ष तर पाटील 10 वर्ष आमदार होते त्यांनी विकासवर बोलावे, त्यांनी विकास केला नाही.
सावंत यांनी कोणालाही दुःखावले नाही, जातीभेद केला नाही, जात पात केला नाही. सावंत यांचा विकास पाहून त्यांना विजयी करा असे आवाहन जाकीर सौदागर यांनी मुस्लिम व सर्वधर्मियांना केले.
आमिषाला बळी पडू नका. मी 3 निवडणुका लढलो पण विजयी झालो नाही पण मी ज्याचा प्रचार केला तो निवडुन आला. सावंत हे इसरूप पर्यंत पाणी आणणार आहेत असे बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर यांनी सांगितले.
