बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडीतील गजबजलेल्या वस्तीतील एका घरात चोरट्यांनी अडीच लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान, फ्लॅट नं. ०२, पहिला मजला, पुष्कराज बिल्डिंग, महावीर इलेक्ट्रॉनिक्सच्या शेजारी, बिबवेवाडी येथे ही चोरीची घटना घडली.
फिर्यादींचे घर कुलूप लावून बंद असताना, कोणीतरी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले २,५२,८०० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले करीत आहेत.















