४५ मिनिटात मारल्या १९७३ बैठका
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हास्तरीय स्पर्धेत सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पवन माने यांनी ४५ मिनिटांत १९७३ बैठका मारून विक्रम केला आहे.
सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील ओम साई हेल्थ क्लब येथे धनंजय पाटील युवा मंचातर्फे युवकांच्या जिल्हास्तरीय बैठक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुमारे १७० युवकांनी ४५ मिनिटांत ७१५ ते १९७३ पर्यंत बैठका मारल्या. पवन माने पोलीस दलात कार्यरत असून त्यांनी यापूर्वीही अशा स्पर्धांत भाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभासाठी खडकवासला विधानसभा मतदार संघातील शरद पवार गटाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, ठाकरे गटाचे अध्यक्ष नितीन वाघ, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास नाना दांगट, माजी नगरसेवक हरीदास चरवड, कॉसमॉस बँकेचे संचालक मिलिंद पोकळे, नांदेड जिल्ह्यातील ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख दीपक शेडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खेडेकर, हवेली तालुका अध्यक्ष (किसान काँग्रेस) शंकरराव दांगट, सामाजिक कार्यकर्ते अविनाश चरवड, ऋषिकेश जाधव, अप्पा येवले, खडकवासला काँग्रेस उपाध्यक्ष संजय अभंग, उद्योजक अशोक शेळके, संतोष दैठणकर साहेब, श्री क्लिनिकचे डॉ. हेमंत तुसे, इ. मान्यवर उपस्थित होते. आयोजन पुणे शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन मनोज वैरागे यांनी केले, तर धनंजय पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन अनिकेत देशमुख, मिलिंद कुरंदळे, राहुल लोभे, दीपक लोंढे, विजय गावंडे, विपुल साठे, समीर शेडे, अंबादास बिरादार, समीर वाळुंज, तुकाराम पासलकर, राहुल ढोरजे, रामा शिंदे, दीपक कुदळे, सर्वेश चोरघडे, प्रफुल्ल मोरे, रोहित मौर्य, सुनील सळेकर, अक्षय सनानसे, ऍड. उदय अनभुले, शुभम निकम यांनी केले.
स्पर्धेचे निकाल :
१) ५१ ते ६० वजनी गट : प्रथम क्रमांक : लोकेश कऱ्हाडकर – ११२०
दुसरा क्रमांक : ओम किन्हाळे – १००५
तिसरा क्रमांक : अर्थव मारटकर – ९७६
२) ६१ ते ७० वजनी गट : प्रथम क्रमांक : गणेश बर्गे – ११६८
दुसरा क्रमांक : रुपेश मोरे – १०४५
तिसरा क्रमांक : ओमकार जगताप – ७१५
३) ७१ ते ८० वजनी गट : प्रथम क्रमांक : पवन माने – १९७३
दुसरा क्रमांक : दत्तात्रय बिरादार – ९७८
तिसरा क्रमांक : अशोक पडवळ – ९५४
