अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अंमली पदार्थविरोधी पथक व गुन्हे शाखेने बंडगार्डन भागात धडक कारवाई करून १२,७४,२००/- रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना आगरकर नगर, पुणे रेल्वे स्टेशन येथे काही तरुण गांजा विकत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत १) मानश कुमार स्वाईन (वय ३८ वर्षे, रा. हरीहरुपर, जिल्हा नयाघर, ओडिशा), २) लालमोहन फ्रान्सींस बिर (वय ३४ वर्षे, रा. अंतारबा, जिल्हा गजपती, ओडिशा) आणि ३) श्रीकांत अभिमन्यु बिरा (वय ३७ वर्षे, रा. मोहना, जिल्हा गजपती, ओडिशा) यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून एकूण १२,७४,२००/- रुपये किमतीचा ६१ किलो ६० ग्रॅम गांजा तसेच इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थविरोधी पथक २, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, संदीप जाधव, युवराज कांबळे, सय्यद साहिल शेख, अझीम शेख, आझाद पाटील, नितीन जगदाळे, प्रशांत बोमादंडी, मयूर सूर्यवंशी, उदय राक्षे, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे..
