माधुरी मिसाळ यांच्या प्रचार फेरीला सुरवात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मागील पंधरा वर्षांत नागरिकांसाठी केलेली कामे, भागाचा झालेला कायापालट याच जोरावर माधुरी मिसाळ एक लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वास बाबा मिसाळ यांनी व्यक्त केला आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी बिबवेवाडी प्रभाग क्र. ३६ मधील श्री गणेश मंदिर, बिबवेवाडी ओटा येथे सोमवारी (दि. ४ नोव्हेंबर २०२४) श्री गणेश व मारुतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून बिबवेवाडी ओटा ते इंदिरानगर या मार्गावर प्रचार फेरीचा प्रारंभ केला. यावेळी पर्वती मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख बाबा मिसाळ यांच्यासह भाजप-महायुती मित्र पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचार फेरी दरम्यान माधुरी मिसाळ यांनी मतदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या विकासाच्या संकल्पना लोकांसमोर मांडल्या. त्यांच्या संवादातून विकासाची वचनबद्धता आणि पर्वती मतदारसंघासाठी असलेली त्यांची ध्येयपूर्तीची दिशा स्पष्ट दिसली, अशी माहिती अनिल भन्साळी यांनी दिली.