महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : भूम तालुक्यातील देवळाली येथे स्वयंभू महादेव मंदिर येथे लोकवर्गणीतून उभारण्यात येणाऱ्या सभागृहाचे भूमिपूजन श्री. ष. ब्र. १०८. श्रीगुरु विरूपाक्ष शिवाचार्य मानुरकर महाराज व श्री. ष. ब्र. १०८. श्रीगुरु राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपसरपंच सागर खराडे, समाधान सातव, प्रवीण शेटे, युवराज तांबे, संदेश पाटील (अभियंता पुणे महा नगरपालिका), शिवलिंग स्वामी, बाबासाहेब शेटे, अमोल चिखले, बापू मिटकरी, संजय हाफसे अनिल हाफसे, विजयकुमार शेटे, विकास थोरात, महादेव शेटे, बसप्पा भगत, कौडाप्पा शेटे, भिभाशंकर शेटे, संजय हाफसे, सुरेश बोटे, सिद्धेश्वर भगत बसवेश्वर भगत, विजयकुमार शेटे, प्रमोद बोटे, शिवाजी शेटे, बाळासाहेब हापसे, धनंजय हापसे, सतीश खराडे, बापूराव हाफसे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
