गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सांगरुण (ता. हवेली) येथील एका तरुणाकडून पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आले आहे. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ३च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
सध्या निवडणुका सुरू असल्यामुळे पोलीस सतर्क आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. दि. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ३, पुणे येथील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळालेल्या माहितीनुसार सौरभ अरुण मानकर (वय २३ वर्षे, रा. मु. पो. सांगरुण, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.
स्मशानभूमी सांगरुण येथे तो उभा असताना त्याच्याकडून एक पिस्तूल व एक काडतूस हस्तगत करण्यात आले. त्याच्याविरुद्ध उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे, व सौरभ अरुण मानकरने सदर पिस्तूल त्याच्या साथीदाराकडून घेतल्याचे सांगितले असून हा तपास उत्तमनगर पोलीस स्टेशनचे मुकेश कुरेवाड करत आहेत.
सदर कामगिरी गुन्हे शाखा युनिट ३चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार शरद वाकसे, विनोद भंडलकर, गणेश सुतार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, हरीश गायकवाड, प्रतीक मोरे, राकेश टेकावडे, इसाक पठाण व सुजित पवार यांनी केली आहे.
