कोंढवा भागातील नागरिकांनी केला विजयाचा निर्धार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोंढवा बुद्रुक गावातील ग्रामदैवताचा आशीर्वाद व नागरिकांचा पाठिंबा घेत, अपक्ष उमेदवार गंगाधर (आण्णा) बधे हे हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरस वाढली आहे. बधे यांनी विजय होण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेली असताना, ही निवडणूक अचानक एका नव्या वळणावर पोहोचली आहे. कालपर्यंत केवळ अंदाज लावणाऱ्या लोकांच्या चर्चेत आता बधे यांचे नाव आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेचे (उबाठा) माजी आमदार महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अपक्ष उमेदवार गंगाधर (आण्णा) विठ्ठल बधे हे निवडणूक लढवत आहेत. यामुळे या मतदारसंघात विरोधकांसाठी निवडणूक सोपी राहिलेली नाही; बधे यांच्या सहभागामुळे निवडणूक अटीतटीची होईल, असे नागरिक सांगतात.
कोंढवा बुद्रुकमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामदैवताचा तसेच ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत, जनसामान्यांशी चर्चा करून निवडणूक लढविण्याचा निर्धार बधे यांनी केला. यावेळी नागरिकांनी सांगितले की, नव्वदच्या दशकापासून समाजकार्यात स्वत:ला वाहून घेतलेल्या गंगाधर (आण्णा) विठ्ठल बधे यांनी लोकहितासाठी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी चार अटीतटीच्या निवडणुका लढवल्या आहेत. पंचायत समिती सदस्य म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजलेली आहे.
बधे विजयी होणार
परिवर्तन घडल्यास मतदारसंघ व लोकांचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागत नाही. अपक्ष उमेदवार गंगाधर बधे एक निस्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. बधे विजयी होणार यात शंका नाही. यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना रात्रीचा दिवस करून लढेल. – महादेव बाबर, माजी आमदार, निष्ठावंत शिवसैनिक
