बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उच्चशिक्षित लॅपटॉप चोरट्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक करून ८२ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ०४.१५ ते ०४.३० च्या दरम्यान फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांची लॅपटॉप असलेली बॅग व्ही आय टी कॉलेज, बिबवेवाडी, पुणे येथील कटयावर ठेवली होती, त्यावेळी अनोळखी चोरट्याने ती चोरून नेली. त्या बॅगेत ८२,०००/- रुपये किमतीचे लिनोव्हा व एचपी कंपनीचे दोन लॅपटॉप होते.
याबाबत बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपीला वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अशोक येवले व तपास पथकाने शोध घेतला.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिस अमंलदार आशिष गायकवाड, संजय गायकवाड, शिवाजी येवले व सुमित ताकपिरे यांना गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून संशयित प्रितम तुषार भामरे (वय २१, रा. सिमासागर सोसायटी, मातोश्री अपार्टमेंट, सुखसागर नगर, कात्रज, पुणे) यास २३ ऑक्टोबर रोजी अटक केली.
त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून फिर्यादी व साक्षीदारांची चोरी केलेली ८२,०००/- रुपये किमतीची लिनोव्हा आणि एचपी कंपनीचे लॅपटॉप जप्त करण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अशोक येवले करत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, तपासपथकातील अधिकारी पोलिस उप निरीक्षक अशोक येवले, पोलिस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलिस अमंलदार आशिष गायकवाड, शिवाजी येवले, सुमित ताकपेरे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, प्रणय पाटील व अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.
