लोणावळा येथे राज्यस्तरीय पुरस्कार संपन्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
लोणावळा : लोणावळा येथे ॲक्युप्रेशर, नुट्रिशन, अस्ट्रोनोमी, नुमरोलोजी अँकॅडमी, मलेशिया द्वारा नाशिक येथील डॉ. हर्षल अजितकुमार संचेती (प्रभु परिवार) यांना राज्यस्तरीय आरोग्यदुत प्रेरक प्रशिक्षक समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. हर्षल संचेती गेल्या १५ वर्षापासून निसर्गोपचार, अल्टरनेटिव चिकित्सा, ध्यान धारणा इत्यादी द्वारे रुग्णांना मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांचे अनेक शोध प्रबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिक मध्ये सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत.
प्रेरक वक्ता असल्याने त्यांनी अनेक सेमिनार मध्ये हजारो लोकांना व्यवसाय आणि लाईफ कोच चे मागदर्शन केले आहे. त्यासोबतच जैन, बौद्ध, सनातन धर्मातील विविध साधना प्रचार प्रसाराचे कार्य ते करतात. विविध कंपन्यांना मार्केटिंग व्यवस्थापन, एम्पलाई एंगेजमेंट, वर्क लाइफ बैलेंस इत्यादि चे मार्गदर्शन डॉ. हर्षल यांच्याद्वारे केले जात असते.
गेली २५ वर्षापासून प्रभु परिवार या संस्थेमधील २००० मेंबर्स द्वारे विविध सामाजिक, धार्मिक आणि गो-सेवा कार्य मध्ये ते अग्रेसर आहेत. यावेळी पुरस्कार वितरित करताना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित बागमार, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष प्रीती पाटील, डॉ. संतोष वैद्य, विनोद सोलंकी, गिरीश सोळंकी, लायन्स क्लब चे अध्यक्ष विजय मानकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.