महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : सोलापूर रोडवरील शंतनु मोटर्स समोरील पाईपलाईन लिकेज गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित होती. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते आणि गटाराच्या पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते.
या पाईपलाईन लिकेजच्या समस्या सोडवण्यासाठी युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश नवगिरे यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते आणि आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण आणि जलदाय अभियंता अजय होनखांबे यांना सविस्तरपणे समस्येचे निराकरण करण्याचे सांगून निवेदन दिले होते.
फक्त दहा दिवसांत या समस्येचे निराकरण करण्यात आले आणि लाखो लिटर पाणी वाया जाणे थांबवण्यात राकेश नवगिरे यांना यश मिळाले आहे. यापूर्वीही सोलापूर रोडवरील नगरपालिका शाळा क्रमांक ८ समोरील पाईपलाईन लिकेजच्या दुरुस्तीसाठी निवेदन देऊन ती लाईन देखील दुरुस्त केली होती.
राकेश नवगिरे यांच्या कामाची सोलापूर रोडवरील नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून त्यांना ‘पाणीदार नेता’ असे संबोधले जात आहे. सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यावेळी राकेश नवगिरे यांनी मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण आणि जलदाय अभियंता अजय होनखांबे यांचे आभार मानले आहेत.

















