महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जैन समाजातील प्रतिष्ठित संस्था जितो पुणेच्या नवीन कार्यकारिणीची निवड झाली असून, अध्यक्षपदी उद्योगपती इंद्रकुमार छाजेड तर चीफ सेक्रेटरीपदी दिनेश ओसवाल यांची निवड झाली आहे. त्यांच्या कार्यकारिणीचा शपथविधी 19 डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
जैन समाजातील लोकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी जितो संस्था प्रमुख्याने कार्य करते. आपल्या देशावर, राज्यावर किंवा शहरावर येणाऱ्या अनेक नैसर्गिक संकटांमध्ये या संस्थेने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. जितो पुण्याची ही नवीन कार्यकारणी 2024 ते 2026 या कालावधीसाठी कार्यरत असेल.
या कार्यकारणीमध्ये इंद्रकुमार छाजेड अध्यक्ष, दिनेश ओसवाल चीफ सेक्रेटरी असून, उपाध्यक्ष अजय मेहता, चेतन भंडारी, विनोद मांडोत, विशाल चोरडिया, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया, सह सेक्रेटरी अॅड. विशाल शिंगवी, खजिनदार दिलीप जैन, सह खजिनदार रुपेश कोठारी यांची नियुक्ती झाली आहे.
विशेष आमंत्रितांमध्ये मनोज छाजेड, सीए सुहास बोरा, मिलन दरडा यांचा समावेश आहे. डायरेक्टर पदावर अभिजीत डुंगरवाल, अमित भटेवरा, आनंद चोरडिया, हितेश शहा, जयेश फुलफगर, कुणाल ओस्तवाल, मंगेश कटारिया, मुकेश छाजेड, प्रवीण चोरबेले, रवींद्र दुगड, सचिन जैन, उमेश बोरा, उपेश मर्लेचा आणि संजय जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जितो लेडीज विंगच्या अध्यक्षपदी पूनम ओसवाल (2024-25), एकता भन्साळी (2025-26), तर चीफ सेक्रेटरीपदी अचला भंडारी (2024-25), पूजा राठोड (2025-26) यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष विमल बाफना, रिटा गांधी (2025-26), सेक्रेटरी रेशमा भंडारी (2024-25), रिटा जैन (2025-26), खजिनदार भारती शहा (2024-25) आणि वंदना राठोड (2025-26) यांची निवड करण्यात आली आहे.
जितो युथ विंगच्या अध्यक्षपदी गौरव बाठिया (2024-25), आकाश ओसवाल (2025-26), चीफ सेक्रेटरीपदी सुयोग बोरा (2024-25), प्रणय भंडारी (2025-26) यांची नियुक्ती झाली आहे. उपाध्यक्ष सिद्धार्थ गुंदेचा, सेक्रेटरी जय नहार, सह सेक्रेटरी निधी चोरडिया आणि खजिनदार रोहन शिंगवी यांचीही निवड झाली आहे. या कार्यक्रमासाठी जितोचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच जैन समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
