सुलाखे हायस्कूलबार्शीची सहल यशस्वीरित्या संपन्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हैदराबादमधील सुप्रसिद्ध गोलकोंडा किल्ला, बिर्ला मंदिर, लुंबिनी पार्क, हुसेन सागर तलाव, सीएम हाऊस, रामोजी फिल्म सिटी, चारमिनार, मक्का मशीद, सालारजंग म्युझियम, आंबेडकर पुतळा, एनटीआर गार्डन, आणि लेझर शो यांसारखी अनेक ठिकाणे पाहिली. रामोजी फिल्म सिटी येथे प्रत्यक्ष चित्रपट निर्मिती प्रक्रियेचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी अनुभवले. तसेच विविध स्टेज शो आणि सायंकाळी रामोजीतील विहंगम दृश्यांचा आनंद घेतला.
विद्यार्थ्यांनी हैदराबादच्या सुप्रसिद्ध बिर्याणीचा आस्वाद ‘बावरची’ हॉटेलमध्ये घेतला, तर शाकाहारी भोजन ‘कामत’ हॉटेलमध्ये चाखले. सर्व विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था महाराष्ट्र मंडळ, हैदराबाद येथे करण्यात आली होती.
बार्शी ते हैदराबाद आणि पुन्हा बार्शी हा रेल्वे प्रवास विद्यार्थ्यांसाठी नव्या अनुभवाचा ठरला.सहलमध्ये इयत्ता ७ वी तील ७३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर, प्रभारी प्राचार्य रामकृष्ण इंगळे, पर्यवेक्षक प्रसन्न देशपांडे आणि पर्यवेक्षिका उर्मिला जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहल यशस्वीरीत्या पार पडली
.
सहल प्रमुख सूर्यकांत चोरमले यांनी संपूर्ण सहलीचे नियोजन केले, तर त्यांना शितल सातपुते, अनिता नागटिळक, सोनाली क्षीरसागर, नंदकुमार सोनवणे, विवेक देशमुख व दिनेश बनसोडे यांचे सहकार्य लाभले. सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल बार्शी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालकवर्ग यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
