बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय सहभाग
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२४ रोजी एमआयटी रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज, बार्शी येथे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील १९२ प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.
दिव्यांग गटातून आरुष राहुल शहाणे याने प्रथम क्रमांक मिळवला. माध्यमिक गटातून तनवीर जमील तांबोळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्राथमिक शिक्षक गटातून संग्राम दादासाहेब देशमुख यांनी प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचा गौरव वाढवला. या सर्व विजेत्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
एस.एल. देशमुख व सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन या यशामध्ये महत्त्वाचे ठरले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. मीराताई यादव, एस.बी. शेळवणे व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
विद्यालयाच्या प्राचार्या के.डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन.बी. साठे, विज्ञान प्रमुख एस.एम. हाजगुडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
