महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे – वासुंदे (दौंड): संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर वासुंदे (ता. दौंड) येथील उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक महिला आणि एक पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवार, दि. ३० रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडला.
धरमवीर राधेश्याम सिंग (वय ३८, रा. श्रीनगर, वडगाव शेरी) असे मृत्यू पावलेल्या रिक्षा प्रवाशाचे नाव आहे. याबाबत कॅब चालक पराग सुनिल शर्मा (वय २८, रा. हॅप्पी इस्टेट, चंदननगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी जॉन राजू स्वामी (वय ३१, रा. मुळीक कॉम्प्लेक्स, वडगाव शेरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नगर-पुणे रोडवर आगाखान पॅलेससमोर रविवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
