महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे: शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, प्रतिष्ठानतर्फे शरद पवार यांना भव्य पेंटिंग भेट देण्यात आले.
हे भव्य पेंटिंग कोल्हापूर येथील प्रसिद्ध कलाकार अंबादास पाटील यांनी साकारले असून, ते तयार करण्यासाठी तब्बल तीन महिने लागले. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, विश्वस्त विवेक थिटे, संदीप राक्षे, नमोल खाबिया, ॲड. कृष्णा काजळे, ज्योती तोडकर, अशोक तोडकर, शिवानी आबनावे, प्रा. शागिरा शेख, माजी कृषी आयुक्त देशमुख तसेच प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने यंदा वर्धापन दिनाला एक वेगळीच रंगत आणली आहे. शरद पवार यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा गौरव करत, हे पेंटिंग त्यांच्या कर्तृत्वाचे प्रतीक म्हणून सादर करण्यात आले.
