कात्रज रोडवर गुन्हे शाखेच्या युनिट २ कडून कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करून गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.
सोहम शशिकांत वाघमारे (वय २०, रा. तळजाई वसाहत, सहकारनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ११ जानेवारी रोजी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार आणि संजय जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कात्रज रोडवरील मस्तान हॉटेलजवळ एक व्यक्ती पिस्तुल घेऊन येणार आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी मस्तान हॉटेलजवळ सापळा रचला आणि सोहम वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४८,८०० रुपयांचे पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोहम वाघमारे याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे आणि पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, हनुमंत कांबळे, विनोद चव्हाण, प्रमोद कोकणे, विजयकुमार पवार, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण आणि नागनाथ राख यांनी केली आहे.