महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने वर्ष २०२५ साठी नगरपरिषदेच्या क्षेत्रातील कत्तलखाने आणि मांस विक्रीसाठी काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. यानुसार, २०२५ सालातील विशिष्ट दिवसांवर जनावरांची कत्तल व मांस विक्री पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नगरपरिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार खालील १७ दिवसांवर बंदी राह
1. प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी २०२५ (रविवार)
2. महाशिवरात्री – २६ फेब्रुवारी २०२५ (बुधवार)
3. गुढीपाडवा – ३० मार्च २०२५ (रविवार)
4. श्रीराम नवमी – ६ एप्रिल २०२५ (रविवार)
5. महावीर जयंती – १० एप्रिल २०२५ (गुरुवार)
6. आषाढी एकादशी – ६ जुलै २०२५ (रविवार)
7. स्वातंत्र्य दिन – १५ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार)
8. पर्युषण पर्व – २१ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२५ (गुरुवार ते गुरुवार)
9. महात्मा गांधी जयंती – २ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार)
10. कार्तिकी एकादशी – ९ नोव्हेंबर २०२५ (रविवार)
याबाबत सर्व मांस विक्रेते व संबंधित व्यवसायिकांनी सहकार्य करावे. जर या आदेशांचे पालन करण्यात आले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जाहीर प्रकटन बार्शी नगरपरिषदचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण व आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद यांनी केले आहे.
