हॉटेल स्वे, मुंढवा येथे छापा : हुक्का साहित्य जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दि. १८ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान हॉटेल स्वे येथे अवैध हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखा युनिट ०५ च्या पथकाने हुक्का पुरवण्याचे साहित्य जप्त केले.
पोलीस अंमलदार तानाजी देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हॉटेल स्वे येथे हुक्का पुरवला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी वरिष्ठांना कळवून हॉटेलवर छापा टाकला.
छाप्यामध्ये हुक्का पॉट, फ्लेवर आणि अन्य साहित्य असा एकूण ७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हॉटेल चालक व व्यवस्थापकाविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) कायदा २०१८ अंतर्गत कलम ४अ, २१अ नुसार मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०५चे पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सपोनि. विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, पृथ्वीराज पांडुळे, शुभांगी म्हाळशेकर, आणि संजयकुमार दळवी यांच्या पथकाने पार पाडली.
