भारती विद्यापीठ परिसरातील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे: मनोरुग्ण महिलांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या केअर टेकरनेच एका महिलेसोबत सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी ३८ वर्षीय पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी ३४ वर्षीय केअर टेकरला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही संबंधित संस्थेत राहत होती. आरोपी केअर टेकरने, कोणी नसल्याचा फायदा घेत, ३ ते १० जानेवारीदरम्यान पीडितेच्या रूममध्ये प्रवेश केला. त्याने रूमच्या दरवाजाला कडी लावून, पीडितेच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत.
