विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाऊन नेणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली.
पोलिस तपास पथकाचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि तपास पथकाचे अंमलदार, अमजद शेख व संजय बादरे यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा आदित्य उकीरडे याने केला आहे. यावरून तपास पथकाने कार्यवाही केली आणि आरोपी आदित्य भैरवनाथ उकीरडे (वय २४ वर्षे रा. प्रेमळ दत्त मंदिराजवळ, लेन नं १२, भैरवनगर, धानोरी, पुणे)याला अटक केली.
आरोपीकडून चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि आरोपीने गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेली ५०,००० रुपये किंमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. एकूण १,३०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
