भूम येथील निवडणुकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथील विधीज्ञ मंडळ निवडणूक 2025-2026 साठी ऍड. पंडित विठ्ठल ढगे यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, ऍड. शिवाजी पवार, ऍड. शेषेराव जाधव आणि ऍड. अजित मोटे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ऍड. पंडित ढगे यांची निवड बिनविरोध ठरली.
याशिवाय, उपाध्यक्षपदासाठी ऍड. अमित मोटे आणि सचिवपदासाठी ऍड. शब्बीर सय्यद यांचे अर्ज एकमेव असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. सिराज मोगल यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. घनश्याम लावंड यांनी जबाबदारी पार पाडली.
