जिल्हाध्यक्ष रोहन जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा भूम तालुका अध्यक्षपदी ज्योतीराम पावले यांची निवड करण्यात आली आहे. कामगार मोर्चा मराठवाडा सदस्य सचिन बारगजे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष रोहन जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास आदम शेख, तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, माजी उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष रमेश बगाडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमित पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप महानवर, माजी तालुका उपाध्यक्ष अमोल बोराडे, डॉक्टर तुषार हिवरे यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
