नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनचा गौरव सोहळा
महाराष्ट्र जैन वार्ता
नाशिक : नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनतर्फे अहिल्यानगर येथील सतीश लोढा यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
धनदायी लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. साध्वी प्रीतिसुधाजी म. सा. यांच्या प्रेरणेने गेल्या सतरा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी सतीश लोढा यांना समाजगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शांतीलाल दुगड यांना साधूसंत सेवारत्न पुरस्कार, माधवी पगारिया (संचालिका, अरेना इन्स्टिट्यूट) यांना महिला उद्योगरत्न पुरस्कार, तर पिंटू संचेती आणि ललित बूब यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमात मनीषा चोपडा, मंडप सहयोगी लता लोढा आणि कला सहयोगी अर्चना भन्साळी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची रंगत सी. मोदी आणि जया पाटेकर यांच्या सुरेल गायनाने वाढली. साध्वी मधुस्मिताजी म. सा. यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली, तर साध्वी प्रीतिसुधाजी म. सा. यांनी उपस्थितांना धार्मिक मार्गदर्शन केले.
सोहळ्याला आमदार देवयानी फरांदे, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहनलाल लोढा, कार्याध्यक्ष कांतीलाल चोपडा, सचिव सतीश हिरण, निर्मला चोरडिया, आशिष भन्साळी, आर. के. जैन स्थानकाचे संघपती मंगलचंद साखला, प्रसन्न बडेरा, हिंगोली लोढा, शीतल सुराणा, विनोद कुचेरिया, तसेच मालेगाव एसीपी पद्मजा बढे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका सिंघवी यांनी केले, तर सतीश हिरण आणि राजेश डुंगरवाल यांनी आभार मानले.
