आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खेड शिवापूर टोल नाक्यावर जप्त ५ कोटींवरून गंभीर प्रश्नचिन्ह

Spread the love

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही FIR नोंदवण्यात आलेली नाही, ज्यामुळे गंभीर शंका उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्र युवक काँग्रेसने माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) या प्रकरणातील तपशील विचारला होता. पुणे ग्रामीण पोलीस आणि आयकर विभागाने तपास सुरू असल्याचे सांगत माहिती देण्यास नकार दिला.

पहिल्या अपीलमध्येही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आता दुसरे अपील दाखल करण्यात येणार आहे. मात्र, निवडणूक आयोगाने या प्रकरणातील सर्व माहिती, पंचनामा प्रत आणि तपशील उघड केला आहे.

सरकारी यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव या प्रकरणात स्पष्ट दिसतो. पोलिसांनी निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष कसा काढला, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

FIR नोंदवण्यात आलेली नाही, तरी तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत कायदेशीर लढा देण्याचा निर्धार केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन पारदर्शकता राखली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

युवक काँग्रेसच्या वतीने अक्षय जैन, भूषण रानभरे, विवेक कडू, आशिष व्यवहारे, कौस्तुभ पाटील, अभिजीत हळदेकर, राज जाधव, अथर्व सोनार, तेजस बनसोड यांनी पत्रकार परिषदे मध्ये वरील सर्व माहिती दिली.