ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : सुलाखे हायस्कूल बार्शी येथे क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन प्रशालेच्या वतीने करण्यात आले. ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांच्या हस्ते प्रशालेच्या गरुड ध्वजाचे ध्वजारोहण व क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
सुलाखे हायस्कूलचे उपप्राचार्य रा. द. इंगळे यांनी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, सहसचिव नागनाथ सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख सुनील फल्ले, खजिनदार मानकोजी ताकभाते यांचा सत्कार बुके देऊन केला. यावेळी प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर, उपप्राचार्य रामकृष्ण इंगळे, पर्यवेक्षिका उर्मिला जावळे, तालुका क्रीडा समन्वयक समीर वायकुळे, संतोष पवार, सुहास शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख प्रमोद माळी, विशाल बुडुक, क्रिकेट कोच देशमुख यांच्या उपस्थितीत क्रिकेटचा पहिला सामना ‘अ ब क’ विरुद्ध ‘ड फ’ मुलांचा झाला.
उद्घाटन प्रसंगी राहुल वाणी यांनी विजय संघास 501 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले आणि ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या संस्थेने दोन डिसेंबर 2024 रोजी सुलाखे हायस्कूल येथील दहावीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी अतिश बाळू पवार यांना दोन्ही कानातील श्रवण यंत्रे देऊन सामाजिक कार्य केले होते. क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने राहुल वाणी, नागनाथ सोनवणे, सुनील फल्ले, प्रमोद माळी, देशमुख, सुभाष शिंदे, समीर वायकुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील पर्यवेक्षक प्रसन्न देशपांडे, शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुलाखे हायस्कूल प्रशासन आणि सर्व सहभागी व्यक्तींनी आभार मानले.
