जैनम युवा मंच, पुणे तर्फे ‘गुरुकृपा की रोटी’ उपक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : घोर तपस्वी, खादीधारी कर्नाटक गजकेशरी प. पू. गणेशलालजी म.सा. यांच्या 63 व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातील लाखो भाविक जालना येथे त्यांच्या समाधीचे दर्शन घेतात. त्यांनी अहिंसा प्रसारासाठी मोठे कार्य केले असून, खादी प्रचार, गोशाळा उभारणी आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या पशुहत्या थांबवण्यासाठी भरीव योगदान दिले.
माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी प. पू. गणेशलालजी म. सा. यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र भूषण युवाप्रेरक उपप्रवर्तक डॉ. प. पू. श्री गौरवमुनीजी म. सा. यांच्या प्रेरणेने आणि श्री जैन श्रावक संघ, सुखसागरनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जैनम युवा मंच, पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने गुरुकृपा की रोटी या उपक्रमांतर्गत अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत मार्केटयार्ड, बिबवेवाडी, कात्रज चौक, अप्पर डेपो आणि कात्रज-कोंढवा रोड, पुणे येथे अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जवळपास ७५०० गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले.
या उपक्रमासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी तन, मन आणि धनाने सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप बोरा, देवेंद्र बोरा, महावीर छाजेड, पंकज चुत्तर, अक्षय भन्साळी, चिराग जैन, विवेक गोलेचा, रोशन कोटेचा, रोहन कटारिया, स्वप्नील चुत्तर, पुष्कर संचेती, जय संचेती, विजय मुनोत, महावीर चुत्तर, महावीर मुनोत, विशाखा बोरा, स्वाती चुत्तर, अनिता मुनोत, पायल गोलेचा, हनुमान सिंह राजपुरोहित आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.