लाभार्थ्यांनी मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांनी शासकीय अनुदानित अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
जे शिधापत्रिका धारक आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी मुदतीत पूर्ण करणार नाहीत, त्यांना अन्नधान्याचा लाभ बंद होईल. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्त भाव दुकानदारांशी संपर्क साधून तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानात प्रत्यक्ष उपस्थित राहून ई-पॉस मशीनवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण (Biometric Authentication) करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ई-केवायसीसाठी आवश्यक कुटुंबातील सर्व सदस्यांचे मूळ आधारकार्ड किंवा झेरॉक्स प्रति व रेशनकार्ड ई-केवायसी वेळेत पूर्ण न केल्यास अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची असेल.
ही माहिती निरीक्षक अधिकारी श्रीमती मनीया आन्कर आणि तहसीलदार जयवंत पाटील यांनी दिली आहे.
