आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्मरण आक्काचं व्याख्यानमाला २०२५ – पहिले पुष्प गुंफताना प्रा. यशवंत गोसावी

Spread the love

भूम : समाजामध्ये अविश्वासाचे वातावरण असताना स्मरण आक्काचं व्याख्यानमालेच्या माध्यमातून विश्वास निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन मा. संजय नाना गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधीज्ञ अमरसिंह ढगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कुस्तिसम्राट आसलम काजी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. तानाजी बोराडे आणि डॉ. राहुल अंधारे यांचा विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुल अंधारे यांनी केले. मा. तात्याबा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. सचिन भोसले यांनी आभार मानले.