तातडीने कारवाईची मागणी : माजी आ. राहुल भैय्या मोटे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : परांडा शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स आणि तत्सम अंमली पदार्थांची तस्करी आणि पुरवठा वाढला आहे. या तस्करीमुळे ड्रग्स माफिया गँग सक्रिय झाली असून, त्यांच्या माध्यमातून एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री आणि तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी, तरुण पिढी नशेच्या विळख्यात अडकण्याच्या मार्गावर आहे.
जर यावर वेळीच कठोर कारवाई न केल्यास, आपल्या राज्याचे आणि देशाचे भविष्य असलेली तरुणाई उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालावे आणि या समस्येवर कठोर कारवाईसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांनी केली आहे.
