112 मतदान केंद्रांवर सुविधा व सुरक्षेची काटेकोर व्यवस्था
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी नगरपरिषद निवडणुका सुरळीत, शांततामय आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान केंद्रांवर विविध सुविधा व सुरक्षा व्यवस्थांची जुळवाजुळव करण्यात आली आहे.
शहरातील एकूण 112 मतदान केंद्रांपैकी 43 केंद्रे शाळांमध्ये असून या सर्व केंद्रांवर अपंग आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 20 संवेदनशील मतदान केंद्रांवर CCTV आणि अतिरिक्त सुरक्षा – निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षेच्या दृष्टीने 20 मतदान केंद्रांना संवेदनशील घोषित करण्यात आले आहे.
या सर्व केंद्रांवर CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून पोलिस विभाग आणि निवडणूक कर्मचारी सतर्कतेने पहारा देणार आहेत. 11 क्षेत्रीय अधिकारी, तांत्रिक पथके सज्ज – निवडणूक नियंत्रणासाठी 11 क्षेत्रीय अधिकारी (Zonal Officers) नेमण्यात आले आहेत.
प्रत्येक अधिकारीच्या ताब्यात 2 वार्ड म्हणजे सुमारे 8 ते 10 मतदान केंद्रे असतील. प्रत्येक झोनल अधिकाऱ्यासोबत- कॅमेरामन, पोलिस कर्मचारी आणि स्वतंत्र वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच EVM मध्ये अडचण आल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी 5 तांत्रिक पथके (EVM Technical Teams) तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर कर्मचारी नेमणूक : 1 केंद्राध्यक्ष (Presiding Officer) , 3 मतदान अधिकारी (Polling Officers), 1 शिपाई , 1 पोलीस कर्मचारी.
प्रभाग क्रमांक 07 मध्ये अपवाद : येथे नगरसेवकपदासाठी फक्त एकच उमेदवार असल्याने मतदारांना फक्त 2 मते (नगराध्यक्ष + 1 नगरसेवक) देता येतील. निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, “बार्शी नगरपरिषद निवडणूक पूर्ण पारदर्शकतेने, सुरक्षा आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आवश्यक मानवीबळ, तांत्रिक साधने आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.”
मतदानाची वेळ व प्रक्रिया –
बार्शी नगरपरिषदेसाठी मतदान मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 अशी राहणार आहे.
सकाळी 7.00 वाजता EVM मशीनचे सीलिंग आणि चाचणी अधिकारी यांच्या उपस्थितीत केली जाईल.
प्रत्येक मतदान केंद्रावर 3 स्वतंत्र मतदान विभाग तयार करण्यात आले आहेत.
मतदानासाठी मतदार ओळखपत्र, आधार कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र स्वीकारले जाणार आहे.
सर्व केंद्रांवर NOTA पर्याय उपलब्ध असेल.
प्रत्येक मतदार 3 मते देणार; प्रभाग 7 मध्ये अपवाद –
या निवडणुकीत प्रत्येक मतदारास खालीलप्रमाणे एकूण 3 मते देण्याची संधी असेल :
नगरसेवक (B) – 1 मत
नगराध्यक्ष पदासाठी – 1 मत
नगरसेवक (A) – 1 मत
EVM यंत्रणा व रंग कोडिंग –
प्रत्येक मतदान केंद्रावर EVM साठी-
1 कंट्रोल युनिट (Control Unit)
2 बॅलेट युनिट (Ballot Units) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
बॅलेट शीटचे रंग : नगराध्यक्ष –
फिकट गुलाबी
नगरसेवक (A) – पांढरा
नगरसेवक (B) – फिकट निळा
ज्या विभागात उमेदवार नाही, त्या ठिकाणी बटण सील करून बंद ठेवण्यात आले आहे.















