महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त महावितरण कार्यालयात आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी महावितरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिवभक्त आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाची सांगता जयघोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.
