चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम: येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक धनश्री कुलकर्णी, द्वितीय क्रमांक तेजस्विनी पायाळ आणि तृतीय क्रमांक प्रथमेश जगदाळे याने पटकावला. तसेच वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक उंबरे श्रुती, द्वितीय क्रमांक रोशनी मिसाळ आणि तृतीय क्रमांक संस्कृती पाटील हिने मिळवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संतोष शिंदे होते. प्रमुख व्याख्याते डॉ. नंदकिशोर जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राठोड एम. पी. आणि प्रा. धनश्री पिंपरे यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. दीपाली चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. शिंदे, डॉ. तानाजी बोराडे, डॉ. के. जी. गव्हाणे, ग्रंथपाल प्रा. हरी महामुनी यांच्यासह शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
