व्यापाऱ्यांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : व्यापाऱ्यांमध्ये एकता निर्माण व्हावी आणि नेटवर्किंग मजबूत व्हावे, यासाठी कॅम्प ज्वेलर्स ग्रुपने पहिल्यांदाच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. पुष्पा स्पोर्ट्स ग्राऊंड येथे झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणपती आरती आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी कॅम्प ज्वेलर्स ग्रुपचे अध्यक्ष सुभाष ओसवाल, सचिव मनोज छाजेड आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत पुरुषांचे ८ आणि महिलांचे २ संघ सहभागी झाले, ज्यामध्ये सुमारे १०० सदस्यांनी उत्साहाने भाग घेतला.
विजय भंडारी म्हणाले की, व्यापारी सतत व्यवसायाच्या तणावाखाली असतो, त्यामुळे त्याने स्वतःसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. अशा स्पर्धांमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकता वाढते, नेटवर्क विस्तारते आणि व्यवसायालाही चालना मिळते. तसेच, जीतो ही व्यवसायिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत संघटना असून, तिच्या सदस्यत्वामुळे अनेक संधी उपलब्ध होतात.
