सायबर चोरट्यांचा नवा फंडा असू शकतो : लिंक ओपन करु नका
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वेगवेगळी गिफ्ट, विशेष सुट योजना जाहीर करीत असतात़ त्याचवेळी सायबर चोरट्यांकडून डी मार्ट कडून विशेष गिफ्ट व्हॉऊचर मिळणार असल्याचा दावा करणारी एक बनावट लिंक सर्वत्र प्रसारित होत आहे. त्यातून फसवणुक होण्याचा धोका असल्याचा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.
महिला दिनानिमित्त व्हॉटसअॅप वर डी मार्टच्या नावाने बनावट लिंक पाठविली जात आहे.
ही लिंक ओपन केली असता, त्यामध्ये प्रश्न-उत्तरांची एक सिरीज दिली जाते. सुरुवातीला अगदी साधे साधे प्रश्न विचारले जाऊन आपली वैयक्तिक व बँक खात्याची माहिती (बँक एटीएम कार्ड नंबर, पासवर्ड, सीव्हीव्ही नंबर, इंटरनेट बँकिंग आयडी पासवर्ड) घेतली जाते.
त्यानंतर सायबर गुन्हेगार या बँक खात्याच्या माहितीचा वापर करुन लोकांची फसवणूक करीत आहेत.
Dmart यांच्याकडून विशेष गिफ्ट बाबत व्हॉटसअॅपवर आलेली फेक लिंक ओपन करु नये –
आपली गोपनीय माहिती बँक खाते क्रमांक, बँक एटीएम कार्ड नंबर, पासवर्ड, सीव्हीव्ही नंबर, इंटरनेट बँकिंग आयडी पासवर्ड अशी कोणतीही संवेदनशील माहिती कोणालाही शेअर करुन नये.
फसवणुकीबाबत संशय आल्यास सायबर हेल्पलाईन १९३० किंवा cybercrime.gov.in वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे यांनी केले आहे.
