समाज उपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आनंद मंगल विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजासाठी उपयुक्त कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुरेखा कटारिया होत्या.
७ मार्च २०२५ रोजी समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रकाश कटारिया यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून कीर्तनकार ह. भ. प. किसन महाराज पांडुरंग चौधरी, पंचम झोन जैन कॉन्फरन्स अध्यक्ष नितीन बेदमुथा, भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे विश्वस्त उमेश पाटील, संदेशजी गदिया, शोभाताई बंब आणि पिंपरी चिंचवड जैन महासंघ अध्यक्ष श्रेयस पगारिया उपस्थित होते.
फॅशन डिझायनर शलाका कटारिया आणि प्रभावी भाषण कला साधना व अविष्कार इन्स्टिट्यूटच्या संचालिका कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड उपस्थित होत्या. आनंद मंगल संचलित फॅशन डिझायनिंग डिपार्टमेंटच्या विनिता गेंगजे आणि त्यांच्या ग्रुपने नातेसंबंधांवर आधारित मराठी नृत्यनाटिका सादर केली.
या नाटिकेद्वारे महिलांचे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील योगदान दर्शविण्यात आले. पुरस्कार विजेते मान्यवर कर्तुत्वान आदर्श गृहिणी पुरस्कार – श्रीमती हेमलता कांतीलालजी संचेती स्वाध्याय शिरोमणी पुरस्कार – सौ. स्मिता सुभाषजी रांका कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार – उमेशजी पाटील आदर्श पालकत्व पुरस्कार – सुजाता शिंदे, स्मिता क्षीरसागर, प्राजक्ता भुजबळ कार्यक्रमात महिलांच्या सबलीकरणावर चर्चा झाली.
सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच महिलांनी शिक्षण, व्यवसाय आणि कला क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करावी, असा संदेश मान्यवरांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह. भ. प. कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड कटारिया यांनी केले. आभारप्रदर्शन शलाका कटारिया यांनी केले. मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
